परिस्थिति......!!!

Started by Ravi Padekar, March 14, 2016, 05:17:09 PM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

रस्त्यावर सारी गर्दी अफाट
पडला हा देह मृत्युने घायाल
देहा भवती पिल्ले ही चार
भरूनी आलं त्यांच्या नयनी आभाळ

दु:ख, अश्रु झोळीत टाकुनी
काळाने आनंद हिस्कावून नेले
लाडक्या मुलांना पोरके करुनी
आई बाप विश्व हे सोडून गेले

डोळ्यापुढे सारा अंधार राहिला
जगण्याचा नवा मार्ग न पाहिला
भावंडे घेऊन बहिण विरहात,
पण उमलावे कसे न कळले त्या कळीला

भावंडांसाठी काम शोधू लागली
दु:खाशिवाय हातात न  उरले काही
धुणी-भांडी करून दमडी मिळु लागली
पण दमडीतून तहान भागेना काही

नियतीने मदतीचा हात पुढे आला
तिच्या समोर सुखाचा प्रस्ताव ठेवीला
शहरी काम केल्याने
बक्कळ पैका मिळेल
भावंडांचा आयुष्य हे
पुन्हा नव्याने उजळेल 

विचार करुनी ती तयार झाली
भावंडांना आश्रमशाळेत सोडून आली
पुन्हा आयुष्य नव्याने आशेने उजळेल
कामासाठी शहरी निघुनि गेली

शहरी येवुनी काळ ओढावला
दुखामध्ये हा जीव पुन्हा गहीवरला
नराधमाने तिची किंमत करुनी,
त्यांचा डाव तिला न कळला

शहारली, बावरली, घाबरली
गोंधळून तेथून निसटून गेली
तक्रार करण्या चौकीत आली,
बाजारी औरत म्हणून त्यांच्या पुन्हा हवाली केली

पोटातल्या खडगी साठी
ती देखील लाचार झाली
खांद्यावरचा पदर पाडून,
नियतीने तिला बेजार केली.....

                                                        कवि: रवी पाडेकर (मुंबई)
                                                        मो. 8454843034