हे मुकुंदराजा.....

Started by suryakant.dolase, December 21, 2009, 10:37:22 PM

Previous topic - Next topic

suryakant.dolase

***** आजची वात्रटिका *****
******************************

हे मुकुंदराजा.....

तुमचे कवीपण
खरोखरच आद्य होते आहे.
तुमच्या ब्रॅंडचे म्हणे
लवकरच मद्य येते आहे.

आद्यकवी नंतर मद्यकवी
असे लेबलही जोडले जाईल !
तुमच्या नावाने चिअर्स करीत
बाटलीचे सील फोडले जाइल !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Rahul Kumbhar

वा मस्तच आहे तुमची वात्रटिका, फार आवडली..

MK ADMIN


rudra

#3
गारणं घालतो  थांब मगच सील फोड 8)
हे देवा कवीराजा.......आद्यकवी  ......मद्यकवी............
हे देवा मुकुंदराजा....... मैफिलीत  आमच्या कडून ग्लास -बाटली फोडण्याची
भाडणं करण्याची चुकी झली
तर आमची चुकी पदरात घालून घे महाराजा
..............होय...............महाराजा.....................