Navin Kavya

Started by Anandkand, March 15, 2016, 12:07:02 PM

Previous topic - Next topic

Anandkand

यातना त्या तना

यातना त्या तना,
त्यातुनी या तना||
यात ना त्यात ना,
त्यातुनी यातना ||१||
घेत ना देत ना,
चेतना येत ना ||२||
जात ना पात ना,
त्यातूनच वेदना ||३||
वेळ ना खेळ ना,
हात ना वेतना ||४||
शब्द ना, ओळ ना,
भावनांना दूत ना ||५||
कसली ही भूल ना,
सुटते हे खूळ ना|
त्यामुळे यातना,
त्या तना या तना ||६||

-आनंदकंद