अघटित असे घडतांना पाहिले मी ं

Started by Vikas Vilas Deo, March 15, 2016, 08:30:46 PM

Previous topic - Next topic

Vikas Vilas Deo

अघटित असे घडतांना पाहिले मी
माणसाला माणुसकी सोडतांना पहिले मी

प्राणी राखतात मालाकाशी इमानी
माणसाला पशुप्रमाणे वागतांना पाहिले मी

पैशाच देव असतो, ऐकले होते
पैशासाठी जन्मदात्यांना विकतांना पाहिले मी

दुनिया झाली आहे कुटारखाना
यात माणसाने माणसाला ओरबाडून जगतांना पाहिले मी

वनव्यासारखा मी जळतो का असा ?
पिश्यासारखा मी प्रेम करतो का असा ?

पाण्यावाचून तडफडणार्‍या माश्यासम
तुझ्यावाचुणी मी तडफडतो का असा ?

मृगजळ आहे तुझे भेटणे
तरी मृगप्रमाणे भटकतो का असा ?

तू मागे नाही माहीत असतांनाही
मागे वळून-वळून बघतो का असा ?

तू परतून येणार नसतांनाही
चातकप्रमाणे मी वाट पाहतो का असा ?

ठरविल होत विसरायचे तुला
आठवण तुझी पुन्हा-पुन्हा काढतो का असा ?