अशी तू छळतेस का? े

Started by Vikas Vilas Deo, March 15, 2016, 08:47:02 PM

Previous topic - Next topic

Vikas Vilas Deo

अशी तू छळतेस का?
नजरेने घायल करतेस का ?

स्वप्नात येतेस माझ्या
सत्यात दूर पळतेस का ?

माघे  वळून वळून तर बघतेस
मग अशी चूप बसतेस का ?

नजरेस नजरांना भिडवतेस
मध्येच नजारा फिरवतेस का ?

वाट पाहत तुझी झुरत मी राहतो
तू अशी उशिरा येतेस का ?

साथ देतेस खडतर वाटेवरती
मध्येच सोडून जातेस का ?

मला लावूनीय वेड
माझ्यावर हसत राहतेस का ?

बोलायचे तुझ्यासोबत असतांना
तू गप्प बसतेस का ?

तुझ्या सोबतीस आसुसलेलो असतो मी
तू भेटण्यास टाळतेस का ?