म्हतारपण

Started by Dnyaneshwar Musale, March 18, 2016, 12:55:50 AM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

काय राहिले आता
थरारला हात
लोंबले गाल
आता जिभे वळेना बात

करून ठेवले त्यासी खूप सारे
उलटलेले दिस वावटळीचे  वारे
कुणी द्यावी मजला एक हाक
बुजतात मले पाहुन केर कचरा कोपऱ्यात टाक.

आले असे हे म्हातारपण
भुनभुणते घर शोधी एक एक क्षण
सांगावे कसे हे एक दिन येई प्रत्येकास
लोभी सर्व त्यांसी अहंकाराचा वास.

जे माझे  घडते तेचि असे खरे
घडण्याआधी न बोलणे तेच बरे
ज्यास त्यास वाटे मी खुप गोड
बहरलेल्या झाडासही पोखरते किड.