* विसरण्यासाठी तुला *

Started by कवी-गणेश साळुंखे, March 18, 2016, 07:17:20 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे


विसरण्यासाठी तुला मी
काय नाही केलं
अरे नको तिथे
मन माझं नेलं

ललना असो वा लावण्या
सा-यांना मी नाकारलं
कारण त्यांच्या रुपात
मी तुलाच पाहिलं

मैफिलीत लोकांनी विचारलं
मला काय झालं
खरं सांगतो मी तरी
नाव तुझ नाही घेतलं

विसरण्यासाठी तुला मी
काय काय केलं
अग काळीज माझं
मी तिळतिळ जाळलं
          पण
तरीही सखे तुला
विसरता नाही आलं
जळल्या राखेतुन नाव
तुझंच ते समोर आलं.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938