उपाशीच राहिला हा फादर .......

Started by विजय वाठोरे सरसमकर, March 18, 2016, 11:49:58 AM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर


उपाशीच राहिला हा फादर .......

शेतकरी पाहतो आहे
सरकारी अपेक्षेची वाट
सत्तेपायी सारे नेते
घालत आहेत राजकारणाचा घाट

शेतकरी मागतो आहे
दुष्काळाच्या मदतीचा हात
विधीमंडळातहि  बघा विरोधकांनी
थारा दिला ना साथ 

शेतकरी पाहतो आहे
दाबला जातोय त्याच्या अधिकाराचा श्वास
बघुनी आपल्या संसाराची दशा
बळीराजा घेतो आहे गळफास

शेतकरी पाहतोच आहे
निसर्गही तसाच बेभरवश्याचा
नेतेही तसेच सत्ता भोगणारे
आणि बाजारही लुटारूंचा

म्हणूनच शेतकरी म्हणतो आहे
दीनदुबळ्याची ना आली कुणा कदर
देउनि  सर्वांना सुखसोयी
शेवटी उपाशीच राहिला हा फादर
उपाशीच राहिला हा फादर .........

                              कवी  :- विजय वाठोरे सरसमकर
                                       9975593359