आई साठी काही....

Started by ashvin andhere, March 18, 2016, 11:15:55 PM

Previous topic - Next topic

ashvin andhere

आज लिहावस वाटतंय आई साठी...
काय शब्द सुचवू तिच्या प्रेमा साठी...
तीच प्रेम म्हणजे प्रेरणेची आस....
तीच प्रेम म्हणजे जगण्याची कास....
तीच हृदय जणू अथांग सागर....
त्यात फ़क्त आपल्या प्रीती चा जागर.....
आपल बालपण जगाला न कळणार.....
पण ते आपल्या आईला उमगणार.....
आपण जस जसे होत असतो मोठे....
पण ते आपल्या आईसाठी बाळ छोटे....
आपल वय वर्ष होत खुप....
तिच्या बळाच् देखन रूप....
बाळाच् दुःख कळत नसत जगाला.....
पण त्याचा पत्ता फ़क्त आईला....
भुकेने बाळ काकुलतीने रडत बसे....
आईचे मन व्याकुलतेने विव्हलत असे.....
आई जेव्हा दूध पाजी बाळाला.....
बाळ आनंदाने पाही आईला....
खरच आई आई असते
कोणाची मम्मी, कोणाची माँ, मॉम, अंम्मा असते....
आई सारखी माया नाही या जगात.....
तिच्या प्रेमासाठी शब्दच अपुरे आहेत या काव्यात....

आई आई....

फ़क्त आई आई...

आणखी काय काय लिहू तुझ्या साठी....

( एक भाव विवश प्रेमी )