तिथ जायचय!

Started by Nilkumbhar444, March 19, 2016, 02:31:07 PM

Previous topic - Next topic

Nilkumbhar444

होय मला तिथं जायचय जिथे
कधी माणूस हि जिवंत होता...

जायचय.. हे विस्कटलेले मोहाचे आभाळ फाडून....
जायचय त्यांच्यातल्या लोभरुपी राक्षसला मारायला..

जायचय.... जिथे येत नाही वास स्वार्थाचा त्या नात्यांना...
होत नाही सौदा जिथे धर्म नावाच्या एका शुल्लक गोष्टीचा..

जायचय...... जिथे नसतो मदतीला कधीच फायद्याचा किनारा
आणि घसरल्यास असतो कोणीतरी हात हातात देनारा..

                                                                     -निलेश