ती वाट

Started by abhishek panchal, March 20, 2016, 07:00:37 PM

Previous topic - Next topic

abhishek panchal

ती वाट.....
नेईल तिथे मी जाणार , वळेल तिथे मी वळणार
मग कधीच परत नाही फिरणार , तेव्हा माझी त्यांना गरज कळणार

ती वाट.....

जाईल तिथे मी जाणार , ती देईल ते घेणार
मग काहीच नाही सोडणार , अगदी स्वार्थी होणार

ती वाट.....

कधीच न संपणारी , शेवट पर्यंत मला साथ देणारी
मग मी पुढे थांबेन , पण ती कधीच न थांबणारी

ती वाट.....

मला मागे सोडुन जाईन , अन मी तिथेच रडत असेन
पण मग डोळे पुसुन उठेन , आणि परत मी त्याच वाटेवर दिसेन........     

अशी ती वाट असेल.
                                 
                                          - अभिषेक पांचाळ