वाटा हरवलेल्या

Started by शिवाजी सांगळे, March 20, 2016, 08:22:54 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

वाटा हरवलेल्या

हरविल्या इथल्या वाटा
भयाण हे जंगल आहे,
श्वापदे नाना रूपातली
घेरूनी रक्त शोषू पाहे !

आसुसल्या स्वार्थ नेत्री
हावरेपणाचा मोह राहे,
स्वःनंदा पलिकडे कायम
द्वेषभाव दृष्टीतून पाहे !

सुंदर रूप हे जीवनाचे   
ओसंडून आनंद वाहे,
का असा तू माणसा
दुःखास कवटाळू पाहे !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९