* प्रेम *

Started by कवी-गणेश साळुंखे, March 20, 2016, 10:36:01 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे


खरं सांगतो तुम्हाला मी
मलाही प्रेम करायचं आहे
कुणालातरी आपलंस करुन
मलाही त्याचं बनायच आहे

काय असतं नेमकं प्रेम
ते मलाही बघायच आहे
का वेडी होतात लोक
ते मलाही अनुभवयाचं आहे

खुप काही ऐकलंय प्रेमाबद्दल
की ते एक मृगजळ आहे
क्षितिजापाशी जाता जाता प्रेमाच्या
आयुष्य अनेकांचे संपले आहे

का प्रेमासाठी लढतात दुनियेशी
अशी कोणती जादु आहे
एका व्यक्तीसाठी वैर जगाचे
हसता हसता कबुल आहे

एक झलक बघण्या सखेची
मृत्युलाही दिले आव्हान आहे
असे कसे हे प्रेम गड्या
ज्याने भल्याभल्यांना वेडे केले आहे

काय आहे याची नशा नेमकी
ज्यापुढे मदिराही फिकी आहे
एकदा बघावीच घेवुन चव
नाहीतरी जिंदगी अापली अशीही एकाकी आहे
म्हणुनच मला प्रेम करायचं आहे.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938