भाव रंग

Started by शिवाजी सांगळे, March 23, 2016, 11:08:50 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

भाव रंग

असतात वेग वेगळे 
प्रत्येक भावनेला रंग,
शब्दांच्याही पलिकडे
कधी बोलतात हे रंग !

उत्तेजना दे तो तांबडा
वैराग्याचा नारंगी रंग,
आनंद, सुख विखुरतो
पिवळा आध्यात्मिक रंग !

सृष्टी व्यापक तरीही
एकांत प्रिय हिरवा रंग,
शांत श्यामल सावळ्या
श्रध्देचा निल तो रंग !

पावित्र्याचे प्रतिक होई
मिसळता कधी बहु रंग,
स्पष्ट सरळमार्गी सदा
आवडे सर्वा पांढरा रंग !

गूढ वलयी उत्कटतेला
संवेदनक्षम जांभळा रंग,
अशीच वाहतात महती
निसर्गाचे दूत सात रंग !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

vijaya kelkar

सुंदर ...बोलले रंग

शिवाजी सांगळे

#2
खुप आभार विजया मँडम.... फेस बुकवर शब्दरंग चित्र पाहता येईल....
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

vijaya kelkar

  धन्यवाद,काल  मी 'रंग सोहळा' पोस्ट केली आहे .अवश्य वाचावी .