maitri

Started by sneha31, March 23, 2016, 03:27:40 PM

Previous topic - Next topic

sneha31

रूसवा फुगवा हा मैत्रीचा
वेड लावुनि गेला
अागड्या वेगड्या जगात घेउन गेला
माझ्या भावनाशि खेड खेडुन
का रे मला धोका दिला?????

Sneha maturkar

Nagpur

atish Subrawad

Maitri hi jagatil anmol naat ahe...hi maitri sarvna bhetate pan kahi Jan tikvtat kahi Jan tikvat nahi..................

gopal kawaskar

 मैत्री कशी करतात?


काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.
मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर
मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?
कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात
या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला
आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
अशी असते ती मैत्री
ठेवा या लक्षात गोष्टी

gopal kawaskar

मैत्री केली आहेस म्हणुन


मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय...
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..
आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातंजुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..
तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..
मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..
समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..
विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊनकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप , मध्येच माघारघेऊ नकोस..