वाटसरू

Started by शिवाजी सांगळे, March 23, 2016, 06:57:16 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

वाटसरू

जीवाकडून शिवाकडे
भक्तीचा वारू,
ध्यानाच्या प्रवासाचा
तू वाटसरू !

जन्म मृत्युच्या त्या
फे-या आडून,
शोध परमात्म्याचा
आत्म्या कडून !

प्राक्तन पुण्याईला
जोड इह कर्म,
ज्ञानी जो ठाऊक
त्यासी ते मर्म !

स्व त्वाला शोधता
शोध गुरूचा,
अखंड तू याचक
ज्ञानामृताचा !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९