अंत

Started by kuldeep p, March 24, 2016, 03:22:14 PM

Previous topic - Next topic

kuldeep p

रंगलो रंगात तुझ्या
रंग माझा वेगळा
खेळलो सवे तुझ्या
खेळ का दुभंगला
श्वासात विरुनी तुझ्या
श्वास माझा जाहला
सोबतीने तुझ्या
अंत माझा जाहला
मरणाने माझ्या
अश्रू तुझा ढळला
होताच स्पर्श अश्रूंचा तुझ्या
पावन देह जाहला
सोडून चाललो देहास माझ्या
खेळ माझा संपला
दिले होते सर्वस्व हाती तुझ्या
किंमत ना कळली तुला
धरुनी आता देहास माझ्या
रडशी का खळखळा
रडशी का खळखळा
© कुलदीप
24/03/2016