उडवलेत रंग ऐसे आमच्या आयुष्यातले...

Started by विद्रोही प्रेमवीर, March 24, 2016, 09:59:10 PM

Previous topic - Next topic
उडवलेत रंग ऐसे आमच्या आयुष्यातले..
भगवा-हिरवा-निळा की पिवळा..
झेंडे मिरवू मिरवू जवान्या गेल्या...
काहींच्या बरबादिकडे काहींच्या भरभराटीकड़े...
रंगानी कधी आयुष्यात रंग भरण्याआधी...
त्या रंगांची भीती मात्र ह्या देशात बनू लागली...
भगव्याला मोहल्ल्यात स्थान नाही..
हिरव्याला एरियात...
आणि निळया-पिवळ्याची वस्तीच अलग...
लाल तर हद्दपार त्याच्यावर सरकारी नजर...
आणि काळा....
काळा अंधार मात्र इथल्या झोपड़यांना...
इथल्या शेतकऱ्यांच्या घराला कधी सोडत नसतो..
हां राहिलेच...
इथल्या अन्याय झालेल्या हर एकाच्या निषेधाच्या जोरात...
काळ्याने स्थान मिळवलेय....
तरी सप्तरंगांची दुनिया...
इंद्रधनु...
जाणून बूझुन कवितेत येतोच अनेक रंगांचा उल्लेख...
झुलवली जातेच रंगांची तोरणमाळ धर्मांधांकडून..
ह्या देशाच्या संस्कृतिवर....
पण खऱ्या आयुष्यात...!!
खऱ्या आयुष्यात मात्र रंगांना निवडून...
रंगांना वाळीत टाकल जात त्याच काय????
बोला त्याच काय?
    -विद्रोही प्रेमवीर.(प्रसाद देठे-9768674830)