तू-मी

Started by पल्लवी कुंभार, March 25, 2016, 04:49:55 PM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

तू 'तू' असतोस
मी 'मी' असते
तुझं-माझं करता करता
आपली एक दुनिया बनते

तुझे प्रश्न हजार
माझे उत्तर एक असते
हो-नाहीच्या हिंदोळ्यावर
माझे मन झुरत राहते

तुझ्यात मी असतो
माझ्यात तू असते
तुझ्या-माझ्या जगात
विचारांची वीण असते

शब्दांच्या पटरीवर
जेव्हा मौन धावते
तेव्हा न कळणारी भाषाही
स्पर्श करून जाते

तू असलास
की मी जगते
तू नसतानाही
मी तू जगते

तुझ्या माझ्या नात्याला
धुंद गंधाची लहर येते
तू बरसणारा आकाश असतो
अन मी तृप्त धरती असते 

~ पल्लवी कुंभार

sandip kale


sandip kale