कुठवर जायचे?

Started by शिवाजी सांगळे, March 27, 2016, 06:32:52 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

कुठवर जायचे?

सुखा पाठी दुःख येई
दिवसा माजी रात्र होई,
नियम सृष्टीचा असे तो
कोण कोणा सवे जाई?

लाटेस काय ते ठाउक
किनारा तो कुठवर आहे,
फेसाळत्या बुडबुड्याला
हवेत कधी सोडणे आहे?

केवळ उरे गुढ पोकळी
असेच काहीसे जीवनाचे
शोधुता परी ना सापडे
कोणास कुठवर जायचे?

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९