आत्मविश्वास

Started by smadye, March 27, 2016, 07:17:33 PM

Previous topic - Next topic

smadye

आत्मविश्वास

मी हरवूनी गेलो अपुल्या भूतकाळात
अपुल्या यशाचे पाढे  गात
किती छान होता  तो काळ
अडखळलो तरी  पुढे जाणारी ती चाल

माझ्यात होती पुढे जाण्याची जिद्द
संकटाना मी देत होतो  मात
मी ठरवावे माझे लक्ष्य
मग द्यावे झोकून ते मिळविण्याकडे लक्ष

आता मात्र पाय कुठेतरी अडखळतात
आत्मविश्वासावर घाव घालतात
रोजचा सुर्य घेवून येतो नवी आशा
मात्र दिवसाखेरी असते फक्त निराशा

माझ्यातील मीला मला परत जाग्वायचंय
शिखर गाठायचा प्रयत्न परत करायचंय
हरविलेल्या जीद्देला मैदानात यायचय
मला आता प्रकाशाकडे पळायचंय

माझा आत्मविश्वास मी जागवेन
पुन्हा  घोड्यावर स्वार  मी होईन
हाती यशाचा झेंडा घेवूनी
माझे  लक्ष्य मी गाठेन

       सौ सुप्रिया समीर मडये