बुवाची मिसळ

Started by Mayur Dhobale, March 29, 2016, 08:38:01 AM

Previous topic - Next topic

Mayur Dhobale

******बुवाची मिसळ ******

चौकातल्या 'मिसळ कट्ट्यावर',
आज पुन्हा येतो ...
पण 'बुवाची मिसळ';
आठवण्यातच दंग होतो ...

Lectures, practicals;
Assignments, Study.
यात मन कधीकधी
अगदी विटुन जायच...
तेव्हा मग एखादं कार्ट;
कानांत हळूच फुंक मारायच:
" पोरांनो, चला आज बुवाला जायचं ?"
बस्स!!! गाड्यांना किका बसायच्या...
अन् पिंजऱ्यातले पक्षी,
थेट 'बुवात' हजेरी लावायचे...

'बुवाची मिसळ'....
भावा एक नंबरररर!!!!
'बुवाची मिसळ'....
फार चवही नसायची,
तरीही एक नबंर -
बुवाची मिसळ!!!

तिथे एकमेकांची खेचुन,
उडणारी टर्ररररर...
'तुझी ती' या गंभीर विषयावर ,
तरळणारया गप्पांची 'तरी'...
करीयर , नोकरी;
projects , future plan...
यासारयांवर कच्चून पिळला जाणारा 'लिंबू '...
आणि ताज्या शेवेसारखेच,
कुरकुरीत Non veg विनोद ..
बस्स, आमच्या या कर्तुत्वानेच,
मिसळला आगळी वेगळी
चव यायची...
हवा मात्र फुकटचीच ,
त्या बुवाची व्हायची...
तरीदेखील आतुन म्हणावं वाटतयं-
'बुवाची मिसळ' ;
भावा एकच नंबर !!!!

बुवाची मिसळ आता,
खाऊन झाली ...
तरी आठवणींचा 'कांदा' ,
तसाच डोळ्यांत सलत आहे ...
बुवाची मिसळ सदैव बंद ,
'कटु' सत्य हृदयाला ना परी;
माझ्या डोळ्यांना तरी ,
कळत आहे ......

तेच डोळे पुसता पुसता...
मी पुन्हा जागेवर येतो ...
आणि तो विचारताच-
" बोला, मिसळ कोणती देऊ;
साधी, मिडीयम की तिखट?"
मि चटकन् बोललो-

..... " बुवाची"......

- मयुर ढोबळे
https://www.facebook.com/Mazi-kavita-1505223896380307/