आठवण

Started by ओंम कराड, March 29, 2016, 04:03:41 PM

Previous topic - Next topic

ओंम कराड

मी आज एकटा आहे,
काल ही एकटाच होतो.
कदाचित उद्याही असेन.

तुझ्या आठवणीत सतत भिजत असेन,
माझी नजर फक्त तुलाच शोधत असेल.
जेव्हा मी तुला  शोधून थकतो,
तेव्हा मनातल्या मनात रडत बसतो.

तुला शोधण्यासाठी मी आजही त्या ठिकाणी जातो,
जिथे तू मला भेटत होतिस,
पण,
आजकाल तू  नसतेस मन भरून येतं,
खुप खुप रडावस वाटत,
पण रडता येत नाही.

माझं मन पुन्हा तुझ्या आठवणीत हरवुन जातं,
मन माझ कोमेजुन जातं.
एक वेळ होती माझ्या सोबत तू होतिस,
तुझ्या सोबत मी  होतो,
एकमेकांच्या प्रेमात आपण भिजत होतो.

आज मी तीला आठवतो पावसात भिजताना,
पण सोबत ती नसते.
माझा मलाच राग येतो की कीव येते हे कळतच नाही,
आणि फक्त दुःख आणि दुःख होतं .
                                                - ॐ कराड
                                                   9594304083