भिंती

Started by पल्लवी कुंभार, March 30, 2016, 01:13:06 PM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

स्वप्न घराचे
छोटे का असेना
आपल्या हक्काचे
उभारतो कष्टाने
चार भिंतींना जोडणारे
तरीही
भिंती जातीच्या
भिंती धर्माच्या
भिंती रंगांच्या
भिंती विभक्त नात्यांच्या
भिंतींना भाव शेजारधर्माचा
भिंतींचा भाव उंचीचा
भिंती मातीच्या
मातीला जागणाऱ्या
भिंती काचेच्या
मनाला तडा गेलेल्या
भिंती साक्ष भक्तीच्या
भिंती साक्ष न्यायाच्या
भिंती साक्ष बालपणाच्या
भिंती साक्ष विद्येच्या
भिंती वितभर कुंपणाच्या
तुझं-माझं म्हणत
कागदोपत्री वाटलेल्या
कुठे भिंती तंत्रज्ञानाच्या
जगभर माणसे जोडणाऱ्या
भिंतींच्या भूलभुलैयात
माणूस हरवलाय
न सुटणाऱ्या कोड्यात
कुठेतरी भांबावलाय
तरीही
जोडतोय भिंती
सुसंवाद, चर्चा, सामंजस्याने
कारण जाणतोय एवढेच
वसुधैव कुटुंबकम असण्याचे

~ पल्लवी कुंभार