शिक्षणाचा आव

Started by Mayur Dhobale, March 31, 2016, 09:39:39 AM

Previous topic - Next topic

Mayur Dhobale

पण का..कुणास ठाव?

पण का..कुणास ठाव?
आणताय सारे शिक्षणाचा आव...

जन्मा येताच बालवाडी...
इवल्याश्या हातांवर,
सागाची छडी!!!
उत्सुकत्या डोक्यात ,
शाळेचे नाव...
पण का..कुणास ठाव?

लहानपणीची मौज हरवली...
पाटीवर नुसतीच ,
बाराखडी गिरवली...
डोक्यात जाईना तरी ,
म्हणे डोक्यात सार माव...
पण का..कुणास ठाव?

" तुला सारं काही पुरवतो,
तरी अभ्यास का उरवतो?"
आई-बाबांच्या रोजच्या कटकटींनी,
काळजावर रोज नवा घाव...
पण का..कुणास ठाव?

मन हरवतय निसर्गात ...
झुरतय उडणारया पाखरांत...
वारयासोबत मस्त फडफडतं...
पाण्याच्या लाटेवर,
हळुवार तरंगतं...
नाहीच रमत शाळेत,
त्याला मी तरी काय करणार राव?
पण का..कुणास ठाव?

मार्क्स नाही पडत...
म्हणजे पोरगा गेला फुकट...
गावकरयांच्या त्या वेगळ्या नजरेनं ,
सोडाव वाटतं जिव्हाळ्याचे गावं....
पण का..कुणास ठाव?

असो...मी तर ठरवलयं...
मनाशी, घट्ट भी गिरवलयं....
अनुभवाच्या चालत्या बोलत्या शाळेत ...
दाखिल केलय माझं नाव ....
पण का..कुणास ठाव?

                        - मयुर ढोबळे
https://www.facebook.com/Mazi-kavita-1505223896380307/