प्रेम केलय ग तुझ्या वर....!!!

Started by Ravi Padekar, April 01, 2016, 06:07:01 PM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

प्रेम केलय ग तुझ्या वर प्रेम केलय ग
काळजामध्ये आपल्या स्वप्नांच घर केलय ग

तुला पाहिलं की मनामध्ये धुन वाजते
अन तुझ्याच छम छम पैंजनाची,
जणू त्यांना साथ मिळते
तुझ्या एक एक मेसेज ने,
माझ इनबॉक्स फूल केलय ग
प्रेम केलय ग तुझ्या वर प्रेम केलय ग

आभाळ ही असतेच असे,  ढगांनी भरलेले
तुझ्या माझ्या नात्यात,  बी कुणी पेरलेले
तुझ्या गालावरच्या खळी ने,
मला पार मदहोश केलय ग 
प्रेम केलय ग तुझ्या वर प्रेम केलय ग

हरवलय कुठे तरी, नक्षत्रांच्या गर्दीतलं चांदणं
बनूणी चंद्रकोर तुझ्या कपाळी गोंदण
तुझ्या चंद्रासारख्या मुखड्याने,
माझ आकाश निरभ्र केलय ग,
प्रेम केलय ग तुझ्या वर प्रेम केलय ग

कवि:- रवि पाडेकर (मुंबई) :) :) :)
मो.:- 8454843034.