लपून लपून कुठेतरी पोस्ट माझी वाचतच असेल. ..

Started by Vijay143, April 01, 2016, 07:05:06 PM

Previous topic - Next topic

Vijay143

लपून लपून कुठेतरी पोस्ट माझी
वाचतच असेल. ..
माझ्या फोटोशी एकटेपणात
भांडत असेल...
जेव्हा माझी आठवण तिला
येत असेल ...
वाटत आहे अजून पण
ति रडत असेल...
.
कुठल्यातरी दुसर्‍या नावाने
फेसबुकवर आली तर असेलच...
ID एखादी फेक नक्कीच
बनवली असेल...
कोणी माझ्यात कमी काढली
तर चिडत असेल...
वाटत आहे अजून पण ति
रडत असेल...
.
माझा प्रत्येक अपडेट तिला
आता पण छडत असेल...
माझा चेहरा तिच्यासमोर
येतच असेल...
जेव्हा पण ति कोणाकडून
दुखावली जात असेल...
तेव्हा तिला माझी आठवण
येत असेल...
वाटत आहे अजून पण ति
रडत असेल...
.
लागली आहे सवय माझ्या
कवितांची अशी सुटेल कशी...
घाबरत घाबरत रिक्वेस्ट मला
पाठवली असेल...
उगाच सोडल तुला अस बोलून
स्वतःशीच भांडत असेल...
वाटत आहे अजून पण ति
रडत असेल...
.
खरच परत मिळावा तो मला
येवून त्याच प्रेमाच्या गोष्टी
कराव्या त्याने पुन्हा...
हाच विचार करून मंदिरात
माथा रगडत असेल...
वाटत आहे अजून पण ति रडत असेल...