तडका - रूढीची ऊडी

Started by vishal maske, April 01, 2016, 07:47:28 PM

Previous topic - Next topic

vishal maske

रूढीची ऊडी

पाळायची की तोडायची
धरायची की सोडायची,.?
आलेली पारंपारिक रूढी
सांगा कुठवर नडायची,..?

माणूसकीला बाधक रूढी
आता माणसांनिच मोडावी
अन् माणसांशी माणसांनी
प्रबळ माणूसकी जोडावी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३