घुटमळ जिवाची

Started by गणेश म. तायडे, April 01, 2016, 08:16:32 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

माझ्या मनाची व्यथा
तुला कळायची नाही
डोळ्यातले प्रेम माझ्या
तुला दिसायचे नाही...

जिव पार जडला तुझ्यावरी
तुझ्याविणा जगायचे नाही
बोल अंतरीचे माझे
तुला कळायचे नाही...

प्रेम माझे तुझ्यावर
कधी संपायचे नाही
तुला पाहण्याचा मोह
कधी सुटणार नाही...

हातात हात माझ्या
देऊनी या जगात
चल बांधुया घरटे
सुरेख सुखी आयुष्यात...

हिच ईच्छा उरात
शेवट गोड व्हावा
श्वास शेवटचा माझा
तुझ्या मिठीत निघावा...

- गणेश म. तायडे
    खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com