manu sap

Started by sanjay limbaji bansode, April 02, 2016, 11:04:01 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

नको करू लाड त्याला मातीत गाड
नको मजवरी तु फणफणू
चल, उठ लवकर बघ सोनू
भीम मळ्यात घुसलाय रं साप मनु !!

लय विषारी त्याची जात
त्यानं आताच टाकली कात
बाबाने राखला मळा दिनरात
नको होऊ देऊस तु बर्बाद !
उतर रणा ठेच त्याच्या फणा
भीम क्रांतीचे कुंपण बिनु
चल, उठ लवकर बघ सोनू
भीम मळ्यात घुसलाय रं साप मनु !!

गोंजरुन तुला करतोय नाश
रुढीचा भरवतो विषारी घास
भीम मळ्याचा करून सत्यानाश
नको बनू पुन्हा तु त्याचा दास
सांगे संजय सोड मनुवादी भय
चल भीमक्रांतीची ज्योत बनू
चल, उठ लवकर बघ सोनू
भीम मळ्यात घुसला रं साप मनु !!

भीमकवी संजय बनसोडे
9819444028