deu vadalashi ladhe

Started by sanjay limbaji bansode, April 02, 2016, 11:47:36 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

देऊ वादळाशी लढे....
======================

देऊ वादळाशी लढे
आम्हां संघर्षाचे वेडे
झाला अन्याय अत्याचार कुठे
पाडू दुश्मनांची  मढे !!

तलवार तळपती छत्रपतीची
लेखणी हाती भीम बाबाची
आवाज घेऊन अण्णा भाऊचा
धावू सह्यांद्रीकडे
देऊ वादळाशी लढे !!

कड़ी कपारी दऱ्या खोऱ्यात
कुठेही असू राहू  तोऱ्यात
क्षणात जाऊ उंच आकाशी
राहू सदैव वादळ वाऱ्यात
होवून लढू वीर संभाजी
शिकवू फुले आंबेडकरी धडे
देऊ वादळाशी लढे !!

तूफ़ान वारा पाऊस धारा
आम्हां न सिवे विजेचा मारा
झोपलेल्यांना करून जागे
जागवू आम्हीं महाराष्ट्र सारा
सांगे संजय होईल विजय
चल त्या वीर गतीकडे
देऊ वादळाशी लढे !!
भीमकवी
संजय बनसोडे 9819444028