tya kala ram mandira

Started by sanjay limbaji bansode, April 02, 2016, 11:49:09 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

निश्चय पक्का मिळविण्या हक्का
भीम आला गोदावरी तीरा...
त्या काळाराम मंदिरा, त्या काळाराम मंदिरा !!

दोन मार्च उगवला दिन
आले नाशिक सैनिक भीम
अरे जगू किंवा मरु
जाऊ हक्क येथून मिळवून !

मरण्या उतरले ना मागे सरले
बांधून कफन आपल्या सिरा
त्या काळाराम मंदिरा,त्या काळाराम मंदिरा !!

सनातनी तो फार चिडला
मारण्या भीमसैनिका भिडला
दगडांनी घायाळ केला
रक्ताबंबाळ होऊन पडला !

पुन्हा उठला ना मागे हटला
दिला भीमक्रांतीचा नारा
त्या काळाराम मंदिरा त्या काळाराम मंदिरा !!

सांडिले रक्त गाळीला घाम
परी दिसला ना काळाराम
होते लेकरे तुझी ते ही
तरी का बाटले तुझे रे धाम !

होते तुझेच अंग संजयाशी सांग
का नव्हता त्यांना थारा
त्या काळाराम मंदिरा त्या काळाराम मंदिरा !!


भीमकवी
संजय बनसोडे 9819444028