jatiche soudagar

Started by sanjay limbaji bansode, April 02, 2016, 11:54:21 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

चोर एक नंबर हे येऊन बसले नाक्यावर
जातीचे सौदागर निघाले भीमाचे विकाया घर !!

कुणी कवाड घेई हाती
कुणी उखाडे घराच्या भिंती
कुणा आठवले पुन्हा पाठवले
तोडाया भीम उंबर !
जातीचे सौदागर निघाले भीमाचे विकाया घर !!

कुणी चोरीला घरचा प्रकाश
आम्हा ठेविले अंधारात
आनंद केला आमचा नाहीसा
घास छिनला आमच्या मायेचा
मारून विषमतेच मंतर !
जातीचे सौदागर निघाले भीमाचे विकाया घर !!

केले भिमाचे घर सपाट
लावली भीमकार्याची रं वाट
लावून माया डंक माराया
साप फणा काढीतो वर !
जातीचे सौदागर निघाले विकाया भीमाचे घर !!


भीमकवी संजय बनसोडे
9819444028