uth bhimachy bala

Started by sanjay limbaji bansode, April 02, 2016, 11:55:40 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

काल अँगूठा कापणारे
आज गळा कापत आहेत
भीमरोपटे तुडवणारे
आज भीम मळा कापत आहेत
उठ भीमाच्या बाळा
ओळख त्यांची शाळा
तुझ्या  आत्मसम्माचा
ते निळा कापत आहेत !!

मनु त्यांचा धनी आहे
द्वेष त्यांच्या मनी आहे
उचनीच भेदभावाचा
नांद त्यांच्या कानी आहे !!

आमच्या महापुरुषाच्या नावाने
उगाच कल्ला करीत आहेत
हल्ल्याच्या निदर्शनावरही
मुद्दाम हल्ला करीत आहेत !!

चातुर्वर्णाचा विचार त्यांच्या
डोक्यात आजही सेम आहे
125 जयंती म्हंजे,
तुला फसवण्याचा गेम आहे !!

आंबेडकरी विचारांचा
तुझा लळा कापत आहेत
तुझ्या आत्मसम्मानाचा
ते निळा कापत आहेत !!

उठ भीमाच्या बाळा
उठ ..............!
संजय बनसोडे
9819444028

Mandar Chavan

फार छान आहे कविता ! पण " निळा कापतो आहे " याचा आर्थ जरा सांगितला तर चंगले वाटेल