500 mard mahar

Started by sanjay limbaji bansode, April 02, 2016, 11:57:23 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

भीमा नदी ओरडून सांगे
मर्द महाराची कहाणी
चिंधड्या उडविल्या पेशव्याच्या
त्या...पाचशे महारांनी !!

नव्हता हा देशद्रोह
होता अन्यायाचा बदला
काळे फासले पेशव्यानी
माणसाच्या माणुसकीला !
पंचवीस हजारांशी लढले होते
महार निधड्या छातीनी
चिंधड्या उडविल्या पेशव्याच्या
त्या ...पाचशे महारानी !!

होतो आम्हीही माणूस
मर्दानी आमुचे रक्त
विश्वास ठेवीला ज्यांनी
त्याचे राखिले आम्ही तख्त !
नव्हतो झालो षंड आम्ही
तुमच्या, अन्याय अत्याचारानी
चिंधड्या उडविल्या पेशव्याच्या
त्या ...पाचशे महारानी !!

महार आमची जात होती
वंश आमुचा नागाचा
इंग्रज ही गुणगान गायीं
आमुच्या पराक्रमाचा !
सांगे संजय पूर्वज आमुचे
होते मर्दानी
चिंधड्या उडविल्या पेशव्याच्या
त्या ...पाचशे महारानी !!

bhimkavi
संजय बनसोडे
9819444028