dev nahi gabharyat

Started by sanjay limbaji bansode, April 02, 2016, 12:02:53 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

देव नाही गाभाऱ्यात, पुजारीच बसला
असा कसा भक्ता, तु त्याच्या जाळ्यात फसला !!

नैवेद्य खाई पुजारी, दक्षिणा घाली खिशा
वर्षानुवर्ष तुझी,का तीच ती रं दशा
बघ जरा अंतरी, तुझ्या ह्रुदयीच देव वसला !!

लुटले त्यांनी देशा,ना कुणा येई शंका
दक्षिणाने तुझ्या,बघ भरल्या साऱ्या बँका
झाले श्रीमंत सारे ते,लुटून भोळ्या रंका
लांब लांब रांगेत भक्तच तो पीसला !!

सांगे गाडगे बाबा,देव नाही देवळा
शिवेल कसा पिंड,मेलेला होऊन कावळा
उघड डोळे भक्तां, नको होऊ असा बावळा
संताचे हे विचार, संजय सांगे तुजला !!

संजय बनसोडे 9819444028