वेड प्रेम

Started by sneha31, April 02, 2016, 01:16:10 PM

Previous topic - Next topic

sneha31

का रे असा करतोस
न सांगता माझ्या भावना समजुन घेना
नको खेळ खेळु माझ्या भावनांशी
प्रेमाची चाहुल तरी देना

माझ्या मनातलं कधी बाहेर पळणार नाही
कस सांगु कळणार पण नाही
तुलाच ते समजुन घ्याव लागणार
तुझ्या नसल्याने माझ मन नाही मानणार

तुझ्याशिवाय मी जगु शकणार नाही
तुझ्यासारख मला कुणी मिळणारही नाही
मनात रचली स्वप्नांची रांगोळी
जपुन ठेवलीय तु दिलेल्या गुलाबाची पाकळी

आस लावुनी बसली तुझ्या प्रेमाची
वेड लागलय मला तुझ
हळुच चाहुल लागतय तुझी येण्याची
जगु शकणार नाही तु नसल्याचं

स्नेहा माटुरकर
नागपुर