chal mitra tula chondhi dakhavato

Started by sanjay limbaji bansode, April 02, 2016, 05:15:11 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

!!चल मित्रा तुला चोंढी दाखवतो !!

शेणामातीची घरे, दगड धोंडी दाखवतो
चल मित्रा तुला माझी चोंढी दाखवतो !!

गावरान रई, मायाळू आई
मडक्याच्या उतरंडी दाखवतो
चल मित्रा तुला माझी चोंढी दाखवतो !!

लैझिम डफडी, पोरांची लफडी
गावरान कोंबडी दाखवतो
चल मित्रा तुला माझी चोंढी दाखवतो !!

विजेवीना खंबा, राजकारणी बोंबा
बिना पाण्याची भांडी दाखवतो
चल मित्रा तुला माझी चोंढी दाखवतो !!

भुकेली ढोरं,बेकार गावची पोरं
सुकलेली वरंडी दाखवतो
चल मित्रा तुला माझी चोंढी दाखवतो !!

आटलेली विहीर, ओसाडलेला पीर
पाण्यासाठी तरसणारी लोंढी दाखवतो
चल मित्रा तुला माझी चोंढी दाखवतो !!

थकलेला शेतकरी, माजलेला सरकारी
फासावर लटकलेली मुंडी दाखवतो
चल मित्रा तुला माझी चोंढी दाखवतो !!

सततचा दुष्काळ, मोडलेला फाळ
गावकऱ्यांची दमकोंडी दाखवतो
चल मित्रा तुला माझी चोंढी दाखवतो !!

कवी संजय बनसोडे
9819444028
at-चोंढी
ता.सेनगाव जि.हिंगोली