शेवटची घटका-

Started by Rugwed Sukhatme, April 02, 2016, 08:15:53 PM

Previous topic - Next topic

Rugwed Sukhatme

शेवटची घटका-

शेवटची घटका
मोजत होतो!
रोखून सर्व,
पाहत होतो..

कंठ दाटलेले
डोळे पाणावलेले,
आठवणींच्या झ्हार्यात,
सगळेच भिजलेले..

मी वर याचिका केली
परंतु रथ अर्ध्यात होता!
हि कात टाकून,
आत्मा केह्वाच निघाला होता..

अखेर मी डोळा मिटला
शांततेचा प्रश्न सुटला!
आक्रोशाने मात्र आता,
कोरड्या काठाला पाझर फुटला..

मी पुढे चालत होतो
मागे सगळे ओरडत होते!
मी परत यावे म्हणून आज,
वैरीही रडत होते..

मी जरा पुढे गेलो कि
मागे पाहत होतो!
औन्शाचा औन्श राहिला,
कुठे ते शोधत होतो..

मायेचे अतूट धागे
अनेकांशी बांधले होते!
आज फक्त थोडा दूर गेलो,
म्हणून काय ते सर्व सुटले होते?

-ऋग्वेद सुखात्मे