ते वडाचं झाड

Started by kalpesh.patil, April 03, 2016, 10:34:49 AM

Previous topic - Next topic

kalpesh.patil

🌳 ते वडाचं झाड  🌳

ते वडाच झाड सुध्दा
वाट पहात होतं
येतील दोन पाखरे 🐥🐥
एकांत शोधत
पण तुझ्या माझ्या भेटीला
नजर लागलीय वाटतं
घरटयातलं पाखरू
घरटयातच राहिलं वाटतं

आज तू असं का केलंस
प्रेमरूपी पाखराला
जीवंतपणी मारलंस
आघात घाव सोसूनहि
उड़ण्याचा प्रयत्न मी करतोय
ह्रुदयात तुला ठेवण्यासाठी
घरटे मी बनवतोय

तूच आहेस ती
जीच्यासाठी घरटे मी बनवले
कधी उघडले नव्हते जे
दार तू उघडले
दार उघडे ठेऊन दूर जाऊ नकोस
एकटं सोडून मला पंख माझे मोडू नकोस
ये ना पाखरा उंच भरारी घेऊन
किती छळशील आता हया अर्धमेल्या जीवाला
तुझ्या भेटीच्या आकांताने
घरटयातच सोडले मी हया नश्वर देहाला
घरटयातच सोडले मी हया नश्वर देहाला

          कल्पेश पाटील
            ( पनवेल )
          9594764745