जीवन म्हणजे काय असत...

Started by piushivani, April 03, 2016, 03:59:25 PM

Previous topic - Next topic

piushivani


   कधी उडणाऱ्या पक्ष्यांकडून
   कधी सावकाश चालणाऱ्या कासवाकडून
   तर कधी सरपटणारया सापाकडून
   थोडस शिकावं, जीवन म्हणजे काय असत हे कळेल तेव्हा
   
   कधी वडिलांच्या कटाक्ष उपदेशातून
   कधी आईच्या सस्नेह ममतेतून
   तर कधी मित्रांच्या सहवासात
   राहिल्यास कळत जीवन म्हणजे काय असत.....

                                                 शिवानी