बघं, जमते का?

Started by गणेश म. तायडे, April 03, 2016, 07:21:10 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

जाऊन पहा दुर
बघं, आठवण माझी येते का?
आली जरी आठवण तर
बघं, विसरता मला येते का?
स्वप़्नात जर मी आलो
तर बघ हसू ओठी येते का?
डोळे बंद केले की
बघं, चेहरा माझा दिसतो का?
अडचणीत तु असलीस तर
बघं, डोक्यात माझं नाव येतं का?
एकट्यात शांत बसून तु
ऐक हृदयाचे ठोके
नाव ओठी येईल माझे
जेव्हा पाणावतील डोळे तुझे
दडपण नको घेऊ मनावर
जबरदस्ती कसलीच नाही तुझ्यावर
वेळ जेवढा हवा तेवढा घे
पण हृदय माझे मला परत दे
अडकलो आहे तुझ्यात पुर्ण
आता तरी माझ्या हातात हात दे
बस्सं एकदा पहा माझ्याकडे
हवं तर शरीरातले प्राण घे
शोध घे अख्ख्या दुनियेत
बघं, असा वेडा पुन्हा मिळतो का?
प्रेम करतील ही खुप सारे
बघं, माझ्या सारखं कुणाला जमते का?

- गणेश म. तायडे
   खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com