तडका प्रेमाचा

Started by sneha kukade, April 04, 2016, 11:53:59 AM

Previous topic - Next topic

sneha kukade

कस  राव  जग हे पुढं पुढं चालल
त्यात हल्लीच प्रेम कळेनास झाल !

बॉयफ्रेंड् गर्लफ्रेंड ची  फॅड आता
कम्पल्सरी झाली !
प्रेमाचा ओलाव्याची जाण कुणालाच
न  राहीली !

कमिटमेंट शिवाय चि सोबत आता
गरज वाटू लागली !
खऱ्या प्रेमाची साथ आता बंधन
वाटू लागली !

आज  हि उदया ती न
केला सगळाच घोळ !
नाजूक  साजूक प्रेमाची कुणालाच
का राहिली नाही ओढ !

पोरीना बॉयफ्रेंड उठता बसता
जवळ लागतें !
तेव्हा मग मित्र  नावांची  व्यक्ति
बोचायला लागते !

एकचा प्रेमानं सगळे दुर जातात!
जपलेली  मैत्रीचे शब्द धुक्यान  पुसलि जातात!

खरच का कळेना हेच प्रेम असत
आंधारलेल्या प्रेमात
कुणी दुसर न दिसत !

कधी न हे प्रेम दुर जाओ
परतून मागे  पहिल्या वर
कुणी न राहो ?!

खरं  कधी स्वःछ मनाने प्रेम
करून पाहा !
रंगलेल्या प्रेमा सोबत
सगळी नाती  जपून  पाहा !
मग प्रेमाची साथ अखंड  पुरेल मैत्री
आणी ईतर  नात्यानं तुमच जग फूलेल !