होय, मी विद्रोही ....

Started by sanjay limbaji bansode, April 05, 2016, 10:02:04 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

होय मी विद्रोही ..........✒
-----------------------------------------

प्रस्तापीतांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी पेटवलेले रान
म्हणजे विद्रोह .........

जाती धर्माच्या बेड्या तोडून मानवाच्या कल्याणासाठी झगडने
म्हणजे विद्रोह...........

साऱ्या गुलामगिरीच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी समाजाशी केलेले वैर
म्हणजे विद्रोह..........

प्रस्तापीतांच्या नजरेला नजर भिडून आपला हक्क मागणे
म्हणजे विद्रोह ..........

धर्माच्या विरोधात जाऊन धर्मातल्या अंधश्रद्धा विरोधात आवाज उठवणे
म्हणजे विद्रोह.............

कुणाच्या धमकीला व मरणाला न घाबरता नेहमी सत्याची बाजू घेणे
म्हणजे विद्रोह............

शोषकाकडून होणारे अन्याय आपल्या बुलंद लेखणीतून शोषीतांना सांगणे
म्हणजे विद्रोह ............

समाजाला शोषणातून शोषणरहीत समाजाकडे नेणे
म्हणजे विद्रोह.............

आपल्या समाजातली वाईट घाण काढून समाज मानव कल्याणासाठी परिपूर्ण करने
म्हणजे विद्रोह .............

शोषकांच्या विरोधात शोषीतांचा हा विद्रोह हजारो वर्षापासून चालू आहे.
त्याचे" जू "आता आमच्या खांद्यावर आहे.
या, आपण  सारे मिळून ही शपथ घेऊ  की,
हा विद्रोह थोडा ही न डगमगता पुढे घेऊन जाऊ व समाज परिवर्तन करू.

आपलाच बंधु
संजय बनसोडे
9819444028