भुतं

Started by पल्लवी कुंभार, April 05, 2016, 01:23:17 PM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

भूता-खेताच्या गोष्टी सांगू नका ओ मला,
मला तर रोज चालती फिरती भुतं भेटतायत,
राजकारणवेड्या हडळी, ऑफिसच्या गदारोळात,
पिचकारी मारणारे चिकटगोंदे, रस्त्यावरच्या वाहनांत,
हे तर सोडाच
टीव्ही वर सापडते व्हरायटी,
कुठे बातम्यांत, कधी सिनेमांत,
मनोरंजनाच्या नावावर भटकतायत मिडियावेडे आत्मे...
कधी पाणीपुरीच्या ठेल्यावर,तर कधी हॉटेलातल्या टेबलावर,
सजतायत डिशेस मंत्रोधारित, लिंबू मिरचीच्या तडक्यावर
कुठे धरतायत हात, बाजारभावच्या भाऊगर्दीत,
कोणी पकडतंय गचांडी, सेन्सेक्सच्या मेळ्यावर,
अंगात येतंय डिस्कोथेकच्या ठेक्यावर
अशी नाचतायत भुते, पृथ्वी नावाच्या ग्रहावर
नसला अंधार किंवा पाचोळा सैरावैरा,
तरी पिसाटलेली भुतं, बसली आहेत घराघरांवर,
नसेल मंत्र, पुजाअर्चा या राक्षसांसाठी
तरी गरज आहे बदल घडवणाऱ्या विचारांची

~ पल्लवी कुंभार