तिच्या आठवणीत.....

Started by Mayur Dhobale, April 05, 2016, 05:48:43 PM

Previous topic - Next topic

Mayur Dhobale

कधी कधी वाटतं
असं मस्त काहीतरी घडावं
पंख फुटावे अन्
तिला घेऊन गगनी उडावं
पण वर उडतांना,
पंख छाटले तरररर???
तर खाली पडतांनाही,
तिच्या चेहऱ्यावरच जुन हसु,
पुन्हा नव्याने जपता यावं...
कधी कधी वाटतं
असं मस्त काहीतरी घडावं...

तिच्या आठवणीत
एखादं गाणं  लिहावं...
पण गाणं गाता गाता जर,
कंठच बसला तरररर???
तर मुहम्मद रफीला बोलावून ;
त्याच्या गोड आवाजात ते ऐकावं...
कधी कधी वाटतं
असं मस्त काहीतरी घडावं

रिमझिम रिमझिम पावसात
तिच्यासंगे चिंब  भिजावं...
पण तिच्या जवळ जाता जाता,
अचानक पाऊस थांबला तररररर???
तर तिच्या ओठांवर
साचलेल्या तळ्यात ,
डुबकी घेऊन न्हावं...
कधी कधी वाटतं
असं मस्त काहीतरी घडावं...



-   मयुर ढोबळे

https://www.facebook.com/Mazi-kavita-1505223896380307/