प्रेम का केलं?

Started by गणेश म. तायडे, April 05, 2016, 08:57:38 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

सोडायचचं होतं तर
प्रेम का केलं?
भिरभिरत्या पक्ष्याला
पिंजऱ्यात का कोंडल?
थेंबाला शिंपल्यात ठेवून
मोती का बनवलं?
नव्हतं तुझ प्रेम तर
तु प्रेम का केलं?
हातात हात घेऊन तु
सोबत का चालत होती?
नव्हतचं माझ्यावर प्रेम
तर का गोंजारत होती?
आयुष्याच्या गोष्टीत तु
का रमत होती?
सांग खरंच एकदा
तु माझ्यात का हरवत होती?

- गणेश म. तायडे,
   खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com