गझल

Started by श्री. प्रकाश साळवी, April 06, 2016, 01:28:39 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

वाचित गेलो एकेक शेर तुझ्या श्वासातला
वेचित गेलो एकेक सुगंध तुझ्या मुखड्यातला
पाहीले किनारे मी तुझ्या डोळ्यातले
पाहीला खरेपणा तुझ्या विश्वासातला
पेरून ठेवले जरी काटे कितीही
रस्ता कधी संपणार नाही
रक्ताळला रस्ता कितीही
मी चालण्याचा थांबणार नाही
एकदा चुकुन भेटलो मी वादळाला
जगण्याचा अर्थ मजला तेंव्हा कळाला
आलो मोकळा एकटाच या जगी मी
पीळ नाही सुटला जरी सुंभ जळाला
नदी धावते सागराच्या मिलनाला
किती ओढ आहे या धावत्या जळाला

प्रकाश साळवी