सर

Started by पल्लवी कुंभार, April 06, 2016, 05:43:47 PM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

हवेला आताशा घरघर लागणे
आकाशातही थोडे मळभ दाटणे
आणि अशात तिचे माझ्यावर रुसणे
जणू नियतीने योगायोग गाठणे

सूर्याचे ढगांआड लपणे
हिचे कोपऱ्यात बसून फुगणे
हवेला उष्म्याने ग्रासणे
आणि हिचे अधूनमधून धुमसत राहणे

हिच्या लटक्या रागांना
मी विनवणी करणे
जणू आकाशात घेरलेल्या ढगांना
वाऱ्याने फुंकर घालणे

दाटलेल्या काळोखावर
मग सूर्याचेही रागावणे
तिच्या मुक्या भावनांवर
मग माझेही स्तब्ध राहणे

नाही नाही म्हणता
आली सर एक
तिच्या अबोल्यातून
निसटली अश्रूधार

बिलगली ती त्याला
अलवार घट्ट मिठीत
गंध मोहक पसरले
धरती अंबर मिलनात

~ पल्लवी कुंभार