काय उरले?

Started by शिवाजी सांगळे, April 06, 2016, 11:36:42 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

काय उरले?

निती बदलते स्वार्थापोटी
पैश्या मागे दुनिया सारी,
विसरूनी उपकार सारे
भाऊ होई भावाशी वैरी !

असा का स्वार्थ उपजतो?
नात्याची ही चाड विसरतो,
होत्याचे करूनी ते नव्हते
भ्रामक स्वप्नात तो रमतो !

जीवनी वाहत्या या जगताना
हिशोब आयुष्याचे ते फसले,
चाचपडता अडखळत अखंड
जगण्या न काही ध्येय्य उरले !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९